HW Marathi
देश / विदेश राजकारण

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

मुंबई | “नासाने आतापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले. त्यानंतर अमेरिकेने एकादशी दिवशी चंद्रावर उपग्रह सोडला आणि तो प्रयोग यशस्वी झाला”, असे अजब विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. इस्रोच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘चांद्रयान-२’ मोहिमेत आलेल्या तांत्रिक अडथळ्यामुळे अद्याप ही मोहीम पूर्ण होऊ शकलेली नाही. चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरशी असलेला इस्रोचा संपर्क तुटला. आता याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“अमेरिकेने आतापर्यंत तब्बल ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार ते अयशस्वी झाले. तेव्हा नासाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशी दिवशी उपग्रह सोडला. नासाचा तो प्रयत्न यशस्वी झाला. त्यांनी एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्यादिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. भारताला देखील आपल्याच कालमापन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे”, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.

चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्याने इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ‘चांद्रयान-२’ मोहीम अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. मात्र, विक्रम लँडेरशी संपर्क साधण्याकरिता इस्त्रोचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे, ऑर्बिटरने पाठविलेल्या छायाचित्रांमधून विक्रम लँडरचे स्थान देखील समजले असून विक्रम लँडर सुस्थितीत असल्याची माहिती देखील इस्रोकडून देण्यात आली आहे. आता लवकरच विक्रम लँडरशी संपर्क देखील होईल, अशी आशा इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी व्यक्त केली आहे.

Related posts

विरोधकांना संपविण्यासाठीचे षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही !

News Desk

एखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल !

News Desk

उन्नाव बलात्कार प्रकरण । ७ दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आदेश

News Desk