HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन, पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत बंदची हाक देण्यात आली आहे पवारांवर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तांनी बारामतीसह राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आली.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ईडीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर ‘ईडी की दादागिरी नही चलेगी’, ‘सरकार हमसे डरती है,’ ‘ईडी को आगे करती है’, अशी घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पवारांविरोधात सुडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द करण्याची भीम आर्मीची मागणी

News Desk

राजस्थानच्या उर्वरित मतदारसंघासाठी मतदानाची तारीख जाहीर

News Desk

काही आमदारांना आमिष दाखविण्यास सुरुवात झालेली आहे !

News Desk