HW News Marathi
राजकारण

नवाब मलिक यांची बैल गाडीवरुन आक्रोश रॅली

मुंबई | मोदी-फडणवीस सरकार इंधन जीएसटी अंतर्गत करणार असल्याचे दावे करत आहेत. पण प्रत्येक्षात मात्र याबाबत कोणतेही पाऊल उचलेले चित्र दिसत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली. मलिक यांनी बुधवारी चेंबूर येथील पांजरापोळ सर्कल ते सायन ट्रॉम्बे रोडवरील पंजाब पेट्रोल पंपापर्यंत आक्रोश रॅली काढली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपसरकरावर ताशेरे ओढले. जोपर्यंत इंधन दरवाढ कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील असा इशारा यावेळी नवाब मलिक यांनी दिला.

मोदी सरकार पेट्रोल दर वाढीतून पैसे कमवत आहे. पण, या इंधन दर वाढीत सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे देखील मलिक यावेळी म्हणाले. या आक्रोश रॅलीत नवाब मलिक यांनी इंधन दर वाढीचा निषेध करण्यासाठी बैल गाडीवर बसून रॅली काढली. या रॅलीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाईक चालवत मोदी सरकार विरोधात घोषणा देत होते. तसेच मोदी सरकार मुर्दा बाद, पेट्रोल-डिझेल दर वाढ करणारे मोदी फडणवीस सरकार चले जाव, फेकू सरकार गो बॅक, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा या रॅलीत दिल्या गेल्या.

नवाब मलिक यांनी पंजाब वाडी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ‘अच्छे दिन’ आले असे सांगून प्रवाशांना साखर देऊन मोदी सरकारच्या अच्छे दिनचा फजा उडा असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग १६ दिवसापासून वाढ होत आहे. या दर वाढीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसने हा मोर्चा काढला होता.

पंजाबवाडी पेट्रोल पंपावर बाईकवर अंत्यसंस्कार

गेल्या १६ दिवसांपासून सरकार दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत आहे. यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रोश रॅलीत कार्यकर्त्यांनी मलिक यांच्या उपस्थितीत बाईकवर पुष्पहार अर्पण करुन अंत्यसंस्कार केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची जळगावातील उमेदवारी उन्मेष पाटलांना, स्मिता वाघचा पत्ता कट

News Desk

सरकार व रिझर्व्ह बँकेतील संघर्षाच्या तलवारी ‘म्यान’ झाल्या आहेत !

News Desk

भाजपचा राम मंदिराचा मुद्दा हा केवळ एक जुमला | उद्धव ठाकरे

News Desk