HW News Marathi
राजकारण

नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही !

मुंबई | यवतमाळमध्ये होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाच्या उदघाटन कार्यक्रमाला नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिका असल्याने त्यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित करू नये, अशी भूमिका मनसेच्या एका स्थानिक नेत्याने घेतली होती. मात्र, आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी करून नयनतारा यांना आपला विरोध नसल्याचे जाहीर केले आहे.

प्रसिद्ध लेखिका नयनतारा यांना ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यास विरोध केल्याच्या प्रकरणावर राज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नयनतारा यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरुर यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, असे राज यांनी म्हटले आहे. शिवाय, संमेलनाच्या आयोजकांना आपल्या सहकऱ्यांच्या भूमिकेमुळे झालेल्या मनस्तापाबद्दल राज यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

“नयनतारा यांना माझ्या पक्षातील एका सहकाऱ्याने विरोध केला असला, तरी मनसेचा अध्यक्ष या नात्याने माझा अजिबात विरोध नाही. महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचे मराठीपण जपले जावे, अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे. पण नयनतारा यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल तर त्यास मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असण्याचे कारणच नाही”, असे राज यांनी पत्रकात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारची मोठी घोषणा; LPG सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी

Aprna

‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक,” अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Aprna

“माझा जुना अर्थवट व्हिडिओ दाखवून दिशाभूल करण्याचं काम”, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण

News Desk