Site icon HW News Marathi

विधान परिषदेच्या मतमोजणीत 2 आमदारांचे मते बाद

मुंबई | विधान परिषदेच्या मतमोजणीला तब्बल 2 तासांनी सुरुवात झाली. यानंतर  महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोटातील एक मतावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. भाजपने निंबाळकरांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतल्यानंतर ते मत बाद झाले. भाजपचे उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपचे एक-एक असे दोन मते बाद झाले आहे. भाजप बाद होऊ नये म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, सत्तधारी आणि विरोधकामधील 1-1 मते बाद झाल्यानंतर यांचा फायदा यामुळे आता 283 मतांची मतमोजणी होणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडे मते बाद झाल्यानंतर आता कोटा बदलला आहे. दोन्ही मते बाद झाल्यानंतर आता 25. 91 वरून  आता  25.71 चा नवा कोटा असा असणार आहे. ही दोन्ही मते बाद  झालेल्यानंतर पहिल्या पंसतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती.

भाजपने आक्षेप घेतलेल्या एका मतपत्रिकेची झेरॉक्स काढणार आहे.  निंबाळकरांच्या कोटातील बाद झालेल्या मतपत्रिकेचे झेरॉक्स केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधान परिषदेत  285 मतदान आमदारांनी मतदान केले. परंतु, भाजपच्या आक्षेप घेतल्यानंतर एक मत बाद झाल्यानंतर आता 284 आमदारांची मते वैध ठरली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज  मतदान पार पडले. विधान परिषदेत 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या बाद झालेल्या मतामुळे कोणाला कमी मते पडली हे सांगणे अवघड झाले आहे.

विधान परीषद निवडणुकीचे उमेदवार

भाजप

१. प्रविण दरेकर

२. श्रीकांत भारतीय

३. राम शिंदे

४. उमा खापरे

५. प्रसाद लाड

शिवसेना

१. सचिन अहिर

२. आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस

१. रामराजे नाईक निंबाळकर

२. एकनाथ खडसे

काँग्रेस

१. चंद्रकांत हंडोरे

२. भाई जगताप

संबंधित बातम्या
भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप; निवडणूक आयोगाला तक्रारीचा मेल
Legislative Council Election : अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

 

Exit mobile version