HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

मुंबई । अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणूकीमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. अहमदनगरमध्ये महानगरपालिका निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती.महापौर-उपमहापौर निवडणूकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावळला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसामध्ये करावा असेही त्या नगरसेवकांना कळवण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे आघाडीत सामील होणार ?

News Desk

महाआघाडीत पहिली संयुक्त प्रचार सभा २० फेब्रुवारी | अशोक चव्हाण

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

News Desk