HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून निंबाळकर आणि खडसेंना संधी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँण्डलवरून ट्वीट करत खडसे आणि निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तिसरा उमेदवार देखील देणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे यांना तिसरा उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेतले. यावेळी खडसे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मी गेल्या 40 वर्षापासून भाजपमध्ये निष्ठेने काम करत होते. भाजपने मला विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे मी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आला. आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर मला न्याय मिळाला,” असे ते म्हणाले.

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे

काँग्रेसने विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली. याआधी विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि नंदूरबारचा जिल्हा प्रमुख आमशा पडवी या दोघांची नावे जाहीर केली आहे. तसेच भाजपने विधानपरिषदेसाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

 

संबंधित बातम्या

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच उमेदवारांची नावे

 

 

Related posts

विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही !

News Desk

राफेलबाबत मोदी सरकार देशभरात घेणार ७० पत्रकार परिषदा

News Desk

अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कायदा करा !

News Desk