Site icon HW News Marathi

“ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही”, हसन मुश्रीफांनी फेटाळले आरोप

मुंबई | “ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील कागलमधील आज (11 जानेवारी) सकाळी 6 वाजता ईडीने घरावर आणि पुणे येथील कार्यालयांवर छापेमारी केली आहे. हसन मुश्रीफांनी ईडीच्या (ED) छापेमारीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार निशाणा साधला.

मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कारखान्यात पैसे गुंतविले, असा आरोप तुमच्यावर होत, असा सवाल पत्रकारांनी हसन मुश्रीफांना विचारल्यावर ते म्हणाले, “ज्या ब्रिक्स कंपनींचा उल्लेख केला जात आहे. त्या कंपनीशी माझा काही संबंध नाही. आता सर्व यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना हा कोणत्याही बँकेने लिलाव केलेला नाही. किंवा कोणी कमी किंमतीत विकत घेतला असे नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडेतत्वावरती ब्रिक्स कंपनीला चालवण्यासाठी दिला होता. आणि ही कंपनी दोन वर्ष अधीच मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवित नाही. या कारखान्यावर संचालक मंडळ निवडणून आलेले आहे. तिथे संचालक मंडळ काम करत आहे.”

 कुटुंबाला नाहक त्रास दिला जातोय

“सत्ता येऊन सहा महिने झाले. कशासाठी हे सगळे केले जाते, याबद्दल मला काही अंदाज नाही. परंतु, यामुळे कुटुंबियांना नाहाक त्रास होतो. आता मुलीच्या घरात गेले, मुलीच्या सासूला त्रास देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. घरात सुना आणि नातवंडे आहेत. आणि मग भयभीत वातावरण करायचे, सगळे पोलीस न्यायचे. माझ्याविरोधात काय कारवाई करायची ती करा, समन्स काढा, आम्हाला बोलवा. परंतु, एखाद्याच्या कुटुंबाला त्रास देणे, लहान मुलांना त्रास देणे योग्य नाही. अशा रितीने राजकारण करायचे असते जर कारवाई करायची असती तर 4 वर्षापूर्वीच झाली असतीना, दीड दोन वर्षापूर्वीच तक्रार झाली असतीना. आता सत्ता आल्यानंतर सुद्धा हे थांबत नाही याचे मला आश्चर्य वाटते”, असा टोलाही हसन मुश्रीफांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या

हसन मुश्रीफ यांची ED च्या छापेमारीवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधील घर आणि साखर कारखान्यावर EDचा छापा; हे आहे संपूर्ण प्रकरण

 

 

Exit mobile version