Site icon HW News Marathi

जितेंद्र आव्हाडांना उद्या न्यायालयात हजर करणार; तत्पूर्वी होणार वैद्यकीय तपासणी

मुंबई | मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. यानंतर आव्हाडांना उद्या (12 नोव्हेंबर) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाडांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात नेहत आहेत. आव्हाडांनी ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केले आहे. तर वर्तक नगर पोलीस परिसरात मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठा गराडा आहे.

आव्हाडांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये  रविवारी (7 नोव्हेंबर) रोजी रात्री आव्हाडांनी ‘ हर हर महादेव’ (Har Har Mahadev)या सिनेमाचा शो बंद केला होता. या सिनेमाचा शो बंद करताना आव्हाडांनी प्रक्षकांना बाहेर जाण्याचे आवाहन केले. यावेळी आव्हाडांनी राडा केला. या प्रकरणी आव्हाडांसह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार, आव्हाडांवर पोलिसांनी जामीनपात्र गुन्हे होते. आनंतर आजून काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

संबंधित बातम्या

मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणात आता नवे ट्विस्ट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Exit mobile version