Site icon HW News Marathi

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर उपनेते पदी नियुक्ती

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी शिवसेनेते (Shiv Sena) प्रवेश केला आहे. अंधारेंना शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी आज (28 जुलै) पक्षप्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. सेनेत प्रवेश करताना अंधारे या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अंधारेंनी सेनेत प्रवेश केल्यानंतर उपनेते पदाची जबाबदार दिली.  अंधारेंच्या सेनेत प्रवेश करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा नेता प्रमुख आदित्य ठाकरे दोघेही उपस्थित होते.

अंधारे म्हणाले, “ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगा यांचा वापर करून संविधानिक लोकशाहीची चौकट तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी भाजपविरोधात झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिर पेक्षतावादी लोकांनी असले पाहिजे, असे मला वाटते म्हणूनमी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.

 

सुषमा अंधारे यांचा अल्प परिचय

सुषमा अंधारे या कोरेगाव भीमा प्रकरणात मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत फिर्याददार आहेत. अधारे शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या असून गणराज्य संघाच्या प्रमुख देखील आहे. आणि या या संघामार्फत संविधानिक हक्कांबाबत जनजागृती करण्याचे काम करतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या गणराज्य संघचा राष्ट्रवादीला पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, पक्षाकडून अमोल मिटकरी यांना पक्षाकडून विधानपरिषदेवर संधी पाठवण्यात आली. राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी संधी मिळण्याची आशा मात्र त्यावेळी देखील संधी न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर अवळला होता.

 

 

 

 

Exit mobile version