Site icon HW News Marathi

परळीसाठी 100 कोटींचा निधीच्या श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने 

बीड | बीड जिल्ह्याच्या परळी मतदार संघातील विकास कामाच्या श्रेयवादावरून मुंडे बहीण भावात पुन्हा एकदा जुंपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे नुकतेच केंद्रीय भूपृष्ठा वाहतुक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात ,पुन्हा जुंपल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे.

परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघां बहीण भावानीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून नितीन गडकरींचे आभार मानले आहेत.

मुंडे भगिनिंचा दावा!

परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितम मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.

माजी मंत्री धनंजय मुंडेंचा दावा!

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व राज्य मार्ग 361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे व त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी 100 कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, धनंजय मुंडे यांनी समस्त परळीवासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. एकंदर परिस्थिती ला पाहता मुंडे बहीण भावात विकास कामाच्या मुद्यावरून नेहमीच श्रेयवादाची लढाई पहावयास मिळते याचे आणखी एक ताजे उदाहरणं म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Exit mobile version