Site icon HW News Marathi

“मी कधीच माघार घेत नाही”, जितेंद्र आव्हाडांची ठाम भूमिका

मुंबई | “मी कधीच माघार घेत नाही”, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी एमपीएसीमधून महाराष्ट्राचा इतिहास हा विषय गायब करून टाकला, असा आरोप केला होता. यावरून भाजपने आज (6 फेब्रुवारी) जितेंद्र आव्हाडाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्याविरोधात आंदोलन केली होती. मी कधीच माघार घेत नाही, असे जितेंद्र आव्हाडांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जे काही दाखविले जात आहे की, मी जे काही सारवा सारव करतोय. माझ्या आयुष्यात मी जे काही बोललोय, त्यावर मी कधीच माघार घेत नाही. मी संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले आहे. आपण आरतीमध्ये म्हणतो ना महिषासुर मर्दिनी तिने वद केलेला महिषासुर तिच्या पायाखाली असतो. तो महिषासुर पायाखालून काढून घ्या. मग, काय म्हणाल तुम्ही दिला. उद्या अदमार आणि सावरकर यांचे अतुट नाते आहे. उद्या अदमार घाडून घ्याल. मग, काय सांगणार तुम्ही सावरकरांचा इतिहास. इतिहासाला संदर्भ देताना सुद्धा समोर कोणी तरी उभा करावा लागतो. म्हणून त्या इतिहासाला महत्व असते.”

 

मी माझ्या वक्तव्यावर कधीही सारवा सारव करत नाही

“जे तीन सैनापती, आदील शाहीचा सर्वात मोठा सेनापती अफझल खान 1 लाखाचे सैन्य घेऊन येतो. आणि महाराज काही जणांना हाताशी धरून अफझल खानला मारून टाकतात. अफझल खान उभा केला, त्यांचे एकदर चारित्र्य बघितले. त्यांची उंची, त्यांचा आक्रमक पणा त्यांचे एकदर क्रार्य. यात शिवाजी महाराजा त्याला पाच मिनिटात संपवून टाकतात. तिथे शिवाजी महाराज महान सिद्ध होतात. तेव्हा कुठे तरी संदर्भ लागतात. कुठे तरी इतिहासाचे स्पष्टीकरण द्याला. काही संदर्भ लागतात. आणि त्या संदर्भा शिवाय इतिहास सांगता येत नाही. मुळा यांना संदर्भच गायप करायचे आहेत. म्हणजे पुढच्या 200 वर्षानंतर शिवाजी महाराज नसतील, असे होता कामा नये. त्यामुळे मी बोलतोय आणि बोलणार. मी अशा गोष्टींना घाबरत नाही. आणि तुम्ही जे सांगत आहात की, जितेंद्र आव्हाड सारवा सारव करत आहेत. जितेंद्र आव्हाड आपल्या केलेल्या वक्तव्यावर कधीही सारवा सारव करत नाही. त्यांचे स्पष्टीकरण देईल, पण, सारवा सारव अजीबात करणार नाही. माझ्या स्वभावात बसत नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

भाजपच्या सर्व लोकांनी महापुरुषांचे अपमान केले

राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणतात, तुम्ही सगळी सीमा ओलांडून टाकली, यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे मला त्यांना एक सांगायचे आहे. अत्यंत विनम्रपणाने की, माझा मतदारसंघ हा हिंदू आणि मुस्लमान असा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघात 60 टक्के मतदारांची संख्या ही हिंदूची आहे. आणि दुसरी गोष्टी मी जेव्हा बोलतो, तेव्हा विषयाला धरून बोलतो. आतापर्यंत भाजपच्या सर्व लोकांनी महापुरुषांचे अपमान केले आहेत. कुठलाच भाजपचा नेता त्यावर बोलायला आला नाही. आता जितेंद्र आव्हाड हे सगळे उघडे करणार. आणि महाराष्ट्रभर फिरणार म्हटल्यावर ऐवढे सगळे करावे लागणार. भाजपची सगळी आर्मीच बाहेर आली. कितीही मोठी आर्मी आली तरी मी जो विषय हातात घेतला आहे. मी तो विषय सोडणार नाही. मी त्या विषयावर पुढे जाणार. सैन्य किती बरोबर आहे, याचा मी कधीच विचार करत नाही. माझ्या ऐकढ्या क्षमता आहे. म्हणून मी लढत असतो.”

 

 

 

 

Exit mobile version