Site icon HW News Marathi

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; वैद्यकीय तपासणीला परवानगी

मुंबई | आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. नवाब मलिकांच्या वैद्यकीय तपासणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.  नवाब मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. नवाब मलिकांची आज (19 जानेवारी) न्यायालयीन कोठडी संपली. या पार्श्वभूमीवर न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे.

 

नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नवाब मलिक यांच्यावर नेमके काय उपचार सुरू आहेत. या उपचाराची माहिती घ्यावी, तपास यंत्रणेच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आणि तो अर्ज न्यायालयाने स्वीकारला आहे. नवाब मलिकांची जे. जे. रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. इतके महिने नवाब मलिक यांच्यावर काय उपचार सुरू आहेत. नवाब मलिकांच्या तपासणीचा अहवाल 2 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

 

नवाब मलिक यांची एक कडनी निकामी झाली असून त्यांना कडनी प्रत्यारोपणाच्या पुढच्या उपचारासाठी जामीन देण्यात यावा, असा अर्ज त्यांनी न्यायालयात केला होता. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांचा अर्ज फेटाळून लावला आहे. नवाब मलिकांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात अव्हान दिले आहे. या प्रकरणी लकवरच उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version