June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्य समस्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट नसून निवडणूक अधिकारीच | शरद पवार

मुंबई | “ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट या समस्या नसून जेव्हा ईव्हीएम मशीन निवडणूक अधिकाऱ्यांकडे जातात, तेव्हा मतमोजणी करताना गडबड होत असल्याचा दावा,” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवार पुढे असे देखील म्हणाले की, आम्ही तंत्रज्ञांशी आणि विरोधकांशी चर्चा करून या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात जाणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज (१० जून) २० वा वर्धापन दिनानिमित्ताने आयोजिक केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

आपण दिलेले मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नसल्याचे लोकांच्या लक्षात आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोक आता शांत राहतील. परंतु भविष्यात असे घडल्यास जनता कायदा सुव्यवस्था हातात घेतील, अशी परिस्थिती आम्ही होऊ देणार नाही,’ असे पवार या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पवारांनी ईव्हीएमवर भाष्य करताना बारामतीचा उल्लेख केला होता. बारामतीत भाजप जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असे म्हणत शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला होता.

 

Related posts

आधी मला अवघड वाटत होतं मात्र आता यश आपलंच याची खात्री !

News Desk

रामाच्या नावाने चांगभलं…

News Desk

महाराष्ट्रातील पोलिसांचा राष्ट्रपती पदक, शौर्य पदकांनी सम्मान

अपर्णा गोतपागर