June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. या भेटीमाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मनसेला आघाडीत सामील करुन घेण्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगल्या होत्या. यावर कोल्हेंच्या भेटींने शिक्कामोर्तब होणार का?, हे येणारा काळच सांगले.

तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यात मनसेला राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्या आघाडीत सामील करून  घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही आग्रही आहेत. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात महाराष्ट्रात प्रचार सभा देखील घेतल्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमदेवार उभे होते. त्या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेऊन मोदींविरोधात तोफ डागली होती.

 

 

Related posts

प्रकाश जावडेकर यांच्या आईचे निधन

News Desk

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk

ऊस उत्पादकाची फरफट कायमच !

News Desk