Site icon HW News Marathi

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधी विचार धारेचे आहेत. परंतु, मुंबई क्रिकेट असोसिसएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांची युती झाली आहे.  मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे.  यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचविल्या आहेत.

 

दरम्यान, शरद पवार यांनी आयसीसी संघटनांचे अध्यक्ष पद भूषविले आहे. परंतु, आता वयाच्या अटींच्या नियमामुळे शरद पवार निवडणूक लढवू शकत नाही. तर शरद पवारांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एखाद्या नेत्याला अध्यक्ष पदासाठी उभे करू शकले असते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व्यतिरिक्त कोणताही नेता मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत नाही. तर दुसऱ्या बाजूला आशिष शेलार बऱ्याच काळापासून मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत.

 

येत्या काही वर्षात भारतात विश्वचषक स्पर्धा होणार असून या विश्चचषक स्पर्धेचे मुंबईत सामने होण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धेचा फायनल हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाले होते. पुढील काळात होणारी विश्चचषक स्पर्धेचा फायनल मुंबई होऊ शकते. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदासाठी माजी क्रिकेटकर संदीप पाटील इच्छुक आहेत. परंतु, संदीप पाटील हे शरद पवार यांचे ऐकणार का?, अशी शंका खुद पवारांना सुद्धा असेल. यामुळे शरद पवार यांना संदीप पाटील यांच्यापेक्षा आशिष शेलार शरद पवारांचे ऐकतील असे त्यांना वाटते, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Exit mobile version