Site icon HW News Marathi

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | “धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो”, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक, असा उल्लेख राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात भाजप आंदोलन करत आहे. यासंदर्भात शरद पवार यांना आज (3 जानेवारी) पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न केल्यावर त्यांनी पहिल्यांदा ही प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही, या वक्तव्यावरून भाजप आंदोलन करत आहे, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर ज्या नागरिकाला, व्यक्तीला, ज्या घटकाला संभाजी महाराजांबद्दल बोलत असताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामाची आठवण होत असेल, त्यासंबंधिताचा उल्लेख करण्यात काही चुकीचे नाही. काही घटकांना धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील. त्या ठिकाणी धर्माच्या दृष्टीने बघत असतील, तर त्यांनाही माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना धर्मवीर म्हणा, तुम्ही त्यांना स्वराज्यरक्षक म्हणा, त्याबद्दल माझ्यामनात दुसरी शंका नाही. फक्त मला काळजी एकच आहे की, धर्मरक्षक यासंबंधिचा उल्लेख केला नाही. याबद्दलची जी काही तक्रार. काही घटकांची आहे. त्यांच्याबद्दल मला थोडीशी दुसरी काळजी अशी वाटते की, मी कधी टाण्याला जातो, तर त्यावेळेला धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावे येतात. म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधील एक काळातील त्यांचे सहकारी होते. अनेक वेळाला सरकारच्या जाहीरातीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो.  म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो.”

माझ्या मनात कुठलीही शंका नाही

“छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यसरक्षक म्हणून त्यांच्या कामाची आठवण होत असेल, तर त्यासंबंधिचा उल्लेख करण्यात काही चुकीचे नाही. काही नसताना धर्मवीर म्हणून उल्लेख करत असेल, आणि धर्माच्या दृष्टीने त्या ठिकाणी पाहिजे जात असेल, तर त्यालाही माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे, त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना धर्मवीर म्हणा, तुम्ही त्यांना धर्मरक्षक म्हणा, त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही”, असे शरद पवार म्हणाले.

 

 

 

 

 

Exit mobile version