HW News Marathi
राजकारण

राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारला

नवी दिल्ली | राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे नकारला आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्व विरोधकांनी आज (15 जून) दिल्लीत विरोधकांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत देशातील 22 विरोधी पक्ष सहभागी होणार होते. परंतु, फक्त 17 विरोधी पक्षांनी या बैठकीला हजेरी लावली आहे. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना  राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांची विचारणा केली होती. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रपती पदासाठी स्पष्ट नकार दिला.

या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली.  “मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही,” यात शरद पवार म्हणाले. यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राष्ट्रपती पदासाठी आम्ही सर्व पक्षांनी एकच उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. आम्ही इतरांशई सल्लामसलत करणार आहे. अनेक महिन्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो आणि आता पुन्हा एकत्र येऊ. ही एक चांगली सुरुवात आहे.”

या बैठकीत माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती, सुभाष देसाई, ई करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर. बालू , यशवंत सिन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदीच्या शिवसेना, उमर अब्दुल्ला आदी नेते उपस्थित होते. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, अकाली दल, आम आदमी पक्ष णि जगन रेड्डी या बैठकीत गैरहजर होते.

विरोधकांच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जींनी काल (14 जून) शरद पवारांची भेट घेतली.  ममता बॅनर्जी यांनी  शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जावून भेट घेतली. दिल्लीत उद्या (15 जून) 22 विरोधी पक्षांची बैठकीआधी शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.

 

 

 

Related posts

मतदानाच्या पूर्वसंध्येला जयंत पाटील यांचा नंबर हॅक करून अपप्रचार ! 

News Desk

#LokSabhaElections2019 : शिवसेना-भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग !

News Desk

मुख्यमंत्री आणि आंबेडकर यांची मंत्रालयात बैठक; राजकीय विषयावर चर्चा होण्याची शक्यता

Aprna