Site icon HW News Marathi

“अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, शरद पवारांनी भाजपला टोला लगावला

मुंबई | “2014 मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनची घोषणा केली होती. परंतु, त्यांच्यानंतर अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला लगावला. शरद पवार हे आज (29 ऑगस्ट) ठाणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी शरद पवार म्हणाले, ” 2014 मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी पक्षांने अच्छे दिन या प्रकरणाची घोषणा केली होती. आणि ती कमिटमेंट त्यांनी केली होती…त्यांच्यानंतर अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही.” शरद पवार ठाणेसंदर्भात बोलताना म्हणाले, “मी सुद्धा काही सिलेक्टिव्ह जिल्ह्यांमध्ये जातोय…आणि यांची सुरुवात आज ठाण्यापासून केलीय…ठाणे हा महाराष्ट्रातील एक वेगळा जिल्हा आहे. या ठिकाणी विविध प्रश्न आहे.”

भाजपने एकही घोषणा पूर्ण केलेल नाही – शरद पवार

“भाजपने 2014मध्ये अच्छे दिनची घोषणा केली होती. परंतु भाजपच्या या घोषणेचे पुढे काय झाले नाही. भाजपने 2019 मध्ये न्यू इंडिया घोषणा करण्यात आली. पण, ती घोषणा पूर्ण झालेली नाही. आता 2014 मध्ये 5 ट्रीलियन इकॉनॉमी, अशी घोषणा दिली जाईल. मात्र भाजपने दिलेल्या घोषणापैकी एकही अत्याप शंभर टक्के पूर्तता झाले दिसत नाही,” अशी टीका शरद पवार यांनी भाजपवर केली.

 

 

Exit mobile version