HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

राष्ट्रवादीच्या वाताहतीला राष्ट्रवादीच जबाबदार !

मुंबई | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेत आणि विधानसभेकरिता राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातून भाजपमधून पक्षांतर केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. लोकसभेदरम्यान अहमदनगरच्या उमेदवारीवरून पवार आणि विखे-पाटील कुटुंबात झालेल्या वादानंतर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या संपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आता राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

“मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार झालो होतो. मात्र, त्यांच्या नेत्यांनी जुना संघर्ष बाहेर काढला. विखे-पाटील कुटुंबाला संपविण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु, आमच्या रक्तातच राजकारण आहे”, असे म्हणत सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीत सुरु असलेल्या आऊटगोईंगवर बोलताना सुजय विखे यांनी पक्षालाच जबाबदार ठरविले आहे. “राष्ट्रवादीच्या वाताहतीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे”, अशी बोचरी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

“प्रत्येकाला जमिनीवर आणण्याचे काम विखे-पाटील घराण्याने केले आहे. ज्यांनी-ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्यांना पुढच्या एका महिन्यात तो व्याजासह परत करेन”, अशी इशारा देत सुजय विखे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सुजय विखे यांच्या या टीकेनंतर आता लोकसभेला शरद पवार आणि विखे-पाटील घराण्याचा झालेला संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

Related posts

ते राजा मी सरदार

Ramdas Pandewad

हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही !

News Desk

आम्ही युतीकडे १० जागांची मागणी केली आहे !

News Desk