HW Marathi
देश / विदेश राजकारण विधानसभा २०१९

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात वारंवार होणाऱ्या इन्कमिंगमुळे एकीकडे भाजप-शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे मात्र आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१० सप्टेंबर) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात झालेली ही भेट निश्चितच महत्त्वाची मानली जात आहे. शरद पवार यांनी नवी दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या ‘१० जनपथ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये रणनीती आखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये ही भेट झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. लोकसभेत झालेल्या या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप-शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या आऊटगोइंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला आगामी विधानसभेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.

Related posts

इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा कपात

Gauri Tilekar

राहुल गांधी म्हणाले तर वाराणसीमधून निवडणूक लढवेन ! 

News Desk

…तरीही वरिष्ठ नेत्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही !

News Desk