Site icon HW News Marathi

‘या’ कारणामुळे जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे हिवाळी अधिवेशन पुरते निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उद्देशून वापरल्यामुळे जयंत पाटील यांचे 30 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव सत्तधाऱ्यांनी बहुमताने मंजूर केला. या ठरावानुसार, जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशनात पुरते निलंबित केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. यावेळी विरोधक सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना दिशा सालियन प्रकरणी बोलण्याची मागणी केली होती. परंतु, विधानसभा अध्यक्षांनी बोलण्यास नकार दिला. या प्रकरणात सभागृहात गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘तुम्ही एखाद्या सदस्याचा जीव घ्याल’ असे म्हटले. यावर बोलण्याची परवानगी न दिल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे विधान केले. जयंत पाटील यांनी विधानानंतर सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला.

जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या विधानावर बैठक घेतली. यानंतर जयंत पाटील यांचे एका वर्षासाठी निलंबित करा, अशी मागमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जयंत पाटील यांच्या विधानावर अध्यक्षांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत विचार विनिमय झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाची घोषणा केली.

 

 

 

Exit mobile version