Site icon HW News Marathi

भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन; विद्या चव्हाण यांचे टिकास्त्र

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मात्र, त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून महाविकास आघाडीकडून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन झाल्या आहेत, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, “आत्ता पर्यंत भरपूर पत्रकार परिषद झाल्या त्यामध्ये संजय राठोड असतील, मेहबूब शेख असतील किंवा आत्ता नाना पटोले यांची असेल. एखादे स्त्री-पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील तर याविषयी यांनी असं जाहीर पणे बोलणं चुकीचं आहे. तुमच्या पक्षात आले की सगळे पवित्र होतात आणि बाकीच्या पक्षांना टार्गेट करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारे बोलणं बिलकुल बरोबर नाही. चित्रा वाघ यांनी भान राखावं. चित्राताई यांना भान राहिलं नाही. त्या बेचैन झाल्या आहेत कारण की भाजपाकडून काही तरी मिळावं, अशी त्यांना अपेक्षा आहे. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवण्याचा त्यांना अधिकार नाही” असं म्हणत तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का?, असा सवाल चव्हाण यांनी वाघ यांना केला आहे. त्यामुळे एखादे स्त्री-पुरुष एकमेकांना संमतीने भेटू शकतात. पण तुम्ही कोणत्याही पुरुषावर आरोप करता, असं विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ ट्वीट संदर्भात नेमके काय म्हणाले

चित्रा वाघ यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओला “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं…”, अशी कॅप्शन दिली आहे. आणि नाना पटोले, काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसला टॅग केले आहे. “लोकप्रतिनिधीकडून लोकांनी काय बोध घ्यावा. हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे,” असा सवाल उपस्थित करत पटोलेंवर टीका केली.

चित्रा वाघ म्हणाले, “एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात डोकाने किंवा ट्वीट करणे तुम्हाला योग्य वाटते का?, पत्रकारांच्या प्रश्नावर चित्रा वाघ म्हणाल्या, “सोलापूर असो, रायगड असो, कुठलाही पक्ष असू दे, नाना पटोले असू दे किंवा आणखी कोणी असू दे. ज्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी असतात, त्या ठिकाणी बसता, तुमची जबाबदारी कितेक पट्टीने वाढलेली असते. ज्या वेळेला अशा काही गोष्टी होतात. अशा वेळी आमच्या हाता ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टी निश्चित पणे आम्ही करतो. आमच्या पक्षाला कळाले, तेव्हा आम्ही तात्काळ दखल घेत. त्या ठिकाणी राजीनामे घेतले. परंतु, तरी सुद्धा टीकेची झोड जी आहे. ती कुठे कमी होताना दिसत नाही. आणि त्यामध्ये हे सगळेच आले. जितके सत्ताधारी, विरोधक सगळेच जण हे त्याबाबतीत प्रश्न उपस्थित करत असतात. पण, मला तुम्हाला सांगायचे आहे की, आपल्या सर्वांच जबाबदारीने वागायचे आहे. आणि अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीकडून लोकांनी काय बोध घ्यावा. हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे.”

चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचा ‘हा’ आक्षेपार्ह व्हिडीओ केला ट्वीट; “काय नाना…..तुम्ही पण…”

Exit mobile version