HW News Marathi
राजकारण

ठाकरे सरकारच्या नामांतराला शिंदे सरकारनी दिली स्थगिती

मुंबई | औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असं नामांतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाला नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा निर्णय घेतला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात शिंदे सरकारने बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे पत्र दिल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही. यामुळे शिंदे सरकारने ठाकरे सरकारच्या नामांतरावर आक्षेप घेत निर्णयाला स्थगिती दिली आहे. याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या नामांतरावर आक्षेप घेतला होता. परंतु, शिंदे सरकार हे तीन नामांतराचे निर्णय पुन्हा घेणार असल्याची माहिती माध्यमांतून पुढे येत आहे.

शिंदेसह 39 आमदारांनी शिवसेनसोबत बंड पुकारले होते. यानंतर हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीला आठवडाभर मुक्कामासाठी गेले होते. यानंतर शिवसेनेने सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करण्यासाठी विधानसभचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठविली होती. यानंतर शिंदे गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाविकास आघाडी सरकारला बहुमताची चाचणी करावी लागणार, असा निर्णय न्यायालयाने 29 जून रोजी दिला. यानंतर अवघ्या काही मिनिटात उद्धव ठाकरेंनी फेसबुक माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

संबंधित बातम्या

मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

 

Related posts

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये जागावाटपवर शिक्कामोर्तब

News Desk

‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय?

News Desk

लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांनाच विचारत आहेत !

News Desk