HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली अमित शाह यांची भेट

  1. मुंबई । भाजपाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी आज (शनिवार, 13 ऑगस्ट) नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन दोघांचेही आभार मानले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुक लक्षात घेऊन आमदार आशिष शेलार यांना पुन्हा तिसऱ्यांंदा पक्षाने मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. काल याबाबत पक्षाने घोषणा केली. त्यानंतर आमदार आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “मुंबईचा महापौर आमचाच होईल”, अशी घोषणा करुन मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, नियुक्तीनंतर त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. तर आज त्यांनी नवी दिल्लीला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना शेलार असं म्हणाले की,”पक्ष संघटनेचे काम करत असताना आम्हाला सदैव मार्गदर्शन, दिशा आणि आशिर्वाद देणारे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे आज भेट घेतली. मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन दाखवलेल्या विश्वासाबाबत त्यांचे मनापासून आभार मानले”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले ?, फडणवीसांचा सवाल

News Desk

शिवसेनेचे हे सूर्ययान मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर सुरक्षित उतरेल !

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी हनुमानासारखा पर्वत उचलू नका ,घरात थांबा! अजित पवारांचं आवाहन

News Desk