HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर

कणकवली | उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्यासह १८ कार्यकर्त्यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. नितेश राणे यांना दर रविवारी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. तसेच आपल्याकडून पुन्हा असा गुन्हा होणार नाही, अशी ग्वाही देखील नितेश राणे यांना द्यावी लागणार आहे. या शर्थींसह नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या १८ कार्यकर्त्यांना शुक्रवारी (५ जुलै) कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, मंगळवारी (९ जुलै) न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत बदल करत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींनी जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज आज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी नितेश चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. नितेश यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर “सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या”, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

“कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?”, असे विचारत नितेश यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदी पुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते.

Related posts

मोदी सरकारविरुध्द काँग्रेसचा अतिविराट मोर्चा

News Desk

राफेलबाबतच्या निर्णयाचे राम मंदिर कनेक्शन

News Desk

मिसेस फडणवीस यांनी महिला बचत गटासाठी घेतली पालिका आयुक्तांची भेट

News Desk