HW News Marathi
राजकारण

नितीन गडकरींचा पराभव निश्चित, काँग्रेसचा दावा

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निश्चित पराभव होणार असल्याचा सूर शुक्रवारी (१० मे) मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत उमटला आहे. नागपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासोबत होणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांकडून यंदाच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचा पराभव होईल, असा विश्वास मुंबईत झालेल्या या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

देशात यंदा २०१४ सालासारखी कोणतीही लाट नाही. यावेळी विदर्भात काँग्रेसला चांगले यश मिळेल. तर नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित होईल असा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या या विश्वासाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसच्या या दाव्यावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीश बापट यांच्या प्रचारातील सहभागावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

दिल्लीत सीआरपीएफचा गणवेश परिधान केलेला संशयित ताब्यात

News Desk

मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या तिजोरीतून उधळपट्टीवर टीकास्त्र

News Desk