HW News Marathi
राजकारण

नितीश कुमार पंतप्रधान पदाचे दावेदार ?, प्रशांत किशोर-सेनेची नवी रणनीती

मुंबई | लोकसभा निवडणुका जवळ येताच राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्रे दिसू लागते. या निवडणुकीत मोदींच्या विरोधात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रबळ दावेदार असल्याची भूमिका जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी मातोश्री भेटी दरम्यान मांडली. त्यावेळी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे देखील किशोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर यांनी मंगळवारी (५ फेब्रुवारी) मातोश्रीवर दाखल होत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. किशोर यांनी मोदी आणि काँग्रेस विरोधात नवीन अजेंडा पुढे केला आहे. किशोर यांनी म्हटले की, नितीश कुमार पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. ज्यांना काँग्रेसचे सरकार नको आणि मोदींचीही सत्ता नको, अशा पक्षांची जुळवाजुळव करू शक्यतात. रालोआत नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची मोट कशी बांधायची, याबाबत प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) नसलेल्या अनेक पक्षांना हे नवीन समीकरण मान्य होण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांची घडी कशी बांधायची, यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. रालोआमध्ये सहभागी नसलेल्या वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमिती, बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुक यांसारख्या प्रादेशिक पक्षांचे जवळपास शंभर खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. नितीश कुमारांचे नाव पुढे केल्यास हे पक्ष रालोआला पाठिंबा देऊ शकतात. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जदयूच्या उमेदवाराला बिजू जनता दलाने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असू शकते, अशी भूमिका किशोर यांनी मांडल्याचे समजते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळालं! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk

मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मुंबईत २ अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल

Gauri Tilekar