HW News Marathi
राजकारण

‘मविआ’चे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार’; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुंबई | “कोणी किती आणि काही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत,”  असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये कलगी तुरा रंगल्याला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये काल (7 जून) संध्याकाळी 6 वाजता शक्ती प्रदर्शन केले. यावेळी महाविकासआघाडीच्या नेत्यांसह 12 अपक्ष आमदारांनी देखील या बैठकीला उपस्थित होते. महाविकासआघाडी आणि अपक्ष आमदारांसोबत 50 मिनिटे बैठक पार पडली होती.

या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती मिळाली आहे. “कोणी किती आणि काही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत,”  असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. राज्यात 24 वर्षानंतर राज्यसभेसाठी निवडणुका होत आहेत, पत्रकारांच्या मुख्यमंत्री म्हणाले, “विचित्र गोष्ट आहे. आपण बिनविरोध निवडणुका होण्याची एक परंपरा पाळत आलेलो आहोत. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडी फार सभ्यात असली तर फार काही हरकत नाही.  आपण जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे, असे मुख्यमंत्री पत्रकारांना म्हणाले, ” 22, 24 वर्षानंतर आता तर आपल्याला आठवावे लागते की, निवडणुका कधी झाली होती.  एक परंपरा पाळाया काही हरकत नव्हती.”

महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष आमदार उपस्थित होते. या बैठकीत  जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आदी नेते मंडळी उपस्थित होते.  राज्यसभेसाठी 10 जूनला राज्यातील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेनेने 2 उमेदवार दिली आहे. तर भाजप 3 उमेदवार दिले आहे. महाविकासआघाडीने भाजपने त्यांच्या एक उमेदवार मागे घ्यावा, आणि विधान परिषदेच्या पाचव्या जागेसाठी मविआ त्यांचा उमेदवार देणार नाही, अशी ऑफर दिला होती. परंतु, भाजपने महाविकासआघाडीची ही ऑफर स्पष्ट नकारली होती. भाजपने देखील अशीच ऑफ महाविकासआघाडीला दिली होती.

 

 

Related posts

भाजपने व्यक्तिगत टीका न करता आमच्याशी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे !

News Desk

रामदास आठवले हे प्रामाणिक कार्यकर्ते | राजा ढाले

News Desk

आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तरीही भाजपमध्ये गेलेलो नाही !

News Desk