Site icon HW News Marathi

माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केला गेला; पंकजा मुंडेंकडून संपूर्ण व्हिडिओ ट्वीट

मुंबई | “मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील हरवू शकत नाही”, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. यानंतर पंकजा मुंडेंच्या भाषणातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या भाषणातील वक्तव्यामुळे पंकजा मुंडेंना टीकास्त्र होत आहे.  पंकजा मुंडेंच्या हा भाषणाचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने  सेवा पंधरवाड्याचे बीड येथील अंबाजोगाई येथे “बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद”  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी हे विधान केले.

यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणातील विधानाचा विपर्यास केला गेल्याचे त्यांनी म्हटले असून त्यांनी त्यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ ट्वीटवर ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ ट्वीट करताना पंकजा मुंडेंनी म्हटले, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17sepपासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights.आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे,”सनसनीखेज” बातम्यातून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या linkवर आहेच.धन्यवाद.”

पंकजा मुंडे नेमके काय म्हणाल्या

जीवनामध्ये कितीही अडखळलात तर थांबू नका, तो विराम नसतो तर तो फक्त अल्पविराम असतो. त्या पुढे बघण्याची सकारात्मकता ठेवा. काही मुले अशी होती, तिथे त्यांची आर्थिक परिस्थिती काही खास नाही. काही मुले अशी आहेत, त्यांच्या त्यांच्या आवडीची टेब असेल, त्यांच्या रुममध्ये एसी असेल, रोज आई बादाम-पिस्ता घालून दूध देत असेल. पण, काही मुलांच्या नशीबात हे नव्हते, मी त्यांच्या सॉयकलॉजीचा विचार जीवनात करते. ते कसे पुढे जातात. असाच एक मुलगा यादेशाला लागला पंतप्रधान मंत्री म्हणून ज्याला गणवेश घ्याला पैसे नव्हते. ज्याच्याकडे शाळेत जाण्यास पैसे नव्हते. त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते. आणि आई चूलिसमोर धुराळ्यामध्ये स्वयंपाक करत होती. त्यांनी देशाचा प्रधानमंत्री बनला. महत्वकांक्षा हा शब्द मला आवडत नाही. पण मोठी दिव्य सप्न बघायला काही हरकत नाही. त्या 10-20 कमी झाले तरी आपण तिथे पोहोचतोच. मी मोदींजींकडे बघते, या व्यक्तीला आराम करायला वेळ नाही. सकाळी चारला उठतात, योगा करतात. जगाची महासत्ता बनन्याचे स्वप्न आहे. पहिल्यांदा जीवनात आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा जीवनात खासदार झाले आणि पंतप्रधान झाले. नंतर प्रधानमंत्री झाले तर ऐतिहासिक विजय बहुमत घेऊन आले. हे काय आहे. हे प्लॅनीग असेत, खूप बुद्धिवान असण्याची अवश्यकता नाही. प्रयत्नामध्ये सातत्य, प्रयत्नामध्ये कष्ट आणि सकारात्मकता हे फार महत्वाची आहे. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान मंत्री लाभला. ज्याचा विश्वावर प्रभाव पडलेला आहे. विश्वामध्ये वलय निर्माण झाले आहे. आणि भारत कुठे तरी महासत्ता बनण्याच्या वाटचालीकडे जात आहे. हे सर्व लोक चळवळीतून घडत असतात. तेव्हा ते आपल्याला काही तरी शिकवित असतात. मोदीजींच्या कार्यक्रमा निमित्ताने तुम्ही येथे आलात. आपण ही निवडणूक लढविताना काही बदल करायचा प्रयत्न करू. ही निवडणूक लढवतात आपण पारंपारिक पद्धतीने निवडणूक न लढता. वेगळ्या विषयावर लढू म्हणजे ही मुले जी बसली आहेत. जातपात, पैसा, अडका, प्रभाव यांच्या पलिकडे जातील. मोदीजींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्यांचा अर्थ असा नाही की, मी पण वंशवादाचे प्रतिक आहे. पण, मला संपवू शकत नाही कोणी, मोदीजींनी पण संपवायचे ठरविले तर संपवू शकणार नाही. तर मी तुमच्या मनात राज्य केले तर तुमच्या जीवनात चांगले करू शकले. ते आपल्यला राजकारणामध्ये स्वच्छा आणायची आहे. कारण राजकारणातून महत्वाचे निर्णय होतात. त्यामुळे या मुलांना चांगले भविष्य दाखविण्यासाठी राजकारणात आपल्याला चांगले बदल करावे लागणार आहेत.

 

 

 

 

Exit mobile version