HW News Marathi
राजकारण

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

मुंबई | महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजप-शिवसेना युतीला पश्चिम महाराष्ट्रात १० तर राज्यात एकूण ४५ जागा मिळतील, असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे.

“एखादे पात्र चांगले काम करते म्हणून एखाद्या नाटक किंवा ऑर्केस्ट्राला प्रचंड गर्दी जमते. परंतु, त्यांना कुणीही मतं देत नाही”, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. पवार कुटुंबामुळेच या निवडणुकीत घराणेशाहीचे प्रमाण वाढले. शरद पवार यांना आपल्या पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी स्वतःच या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य यावेळी लोकसभेत जाणार नाही अशी परिस्थिती आहे, असे स्पष्ट मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलविदा रॉकी ! ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या श्वानाचे निधन

swarit

प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार !

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेससोबत आमची कोणत्याही प्रकराची आघाडी नाही !

News Desk