Site icon HW News Marathi

“…वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | “कोणी कोणाच्या वाटेला गेले नाही. त्यांच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे. “मनसेच्या वाटेला गेल्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री पद गेले”, अशी टीका राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज (10 मार्च) माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला

 

मनसेचा वर्धापन दिन साजरा झाला, यावर संजय राऊत पत्रकाराला उलट सवाल करत म्हणाले, “त्यांचा वर्धापन दिन झाला. मग तुम्हील मला का प्रश्न विचारता. यावर पत्रकारांनी पुन्हा पुढे प्रश्न विचारला की, आमच्या वाटेला गेला म्हणून मुख्यमंत्री पद गेले, अशी टीका राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी केली, असा प्रश्नावर संजय राऊत  म्हणाले, “कोणी कोणाच्या वाटेला गेले नाही. त्यांच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार किंवा मुख्यमंत्री पद का? केले. हे अख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहित नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलेले आहे. आणि जोडीला खोक्के आणि ईडी काय आहे. हे काय मी मनसे प्रमुखांना सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतलेला आहे. फक्त ईडीचा अनुभव आमच्या सारख्या लोकांनी घेऊन सुद्धा आम्ही आमच्या तोफा आणि आमच्या पक्षाचे कार्य सुरू आहे.”

कोणाच्या बोलण्यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही 

राज ठाकरेंनी म्हटले की हिंदुत्व सोडले आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेने कधी हिंदुत्व सोडले नाही. ना कधी सोडणार नाही. कोण काय बोलते, यावर शिवसेनेची भूमिका ठरविली जात नाही. तुम्ही तुमचे काय करा. शिवसेनेने नेहमी महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व हे दोन्ही विषय आपल्यासोबत ठेवले आहेत. या विषयावर शिवसेनेने कधीही तडजोड केलेली नाही. हे सर्वांच माहिती आहे.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले

मनसेच्या वाटेला गेल्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री पद गेले, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. राज ठाकरे सभेत म्हणाले, “भोंग्याच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलविले. विरोध करणारे कोण हिंदुत्वादीच. आणि मला ते कळाले होते की, आत काय राजकारण चालले होते. ते मला समजले होते. म्हणून मी त्यावेळा सांगितले की, आता नको. तर्तास नको, यांना काय करायचे ते करू देते. पण, ज्यांनी हे सगळे केले. त्यांचे पुढे काय झाले. सत्ता केली. हे असेच असत. म्हणून आपल्या वाटेला जायाचे नाही कोणी, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केल्यानंतर मनसैनिकांनी टाळ्या आणि शिंट्या वाजवून त्यांना दात दिली. राज ठाकरे पुढे म्हणाले, “या भोंग्याच्या विरोधात आंदोलन झाले तेव्हा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या गेल्या. महाराष्ट्र भर, बोल ना, वाटेला जायाचे नाही. मुख्यमंत्री पदपदावरून जावे लागले,” असे उद्धगार पुन्हा काढल्यानंतर मनसैनिकांनी टाळ्या आणि शिंट्यांच्या वाजून पुन्हा एकदा त्यांचा उत्साहा वाढविला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, की हे सर्व 22 मार्चचे विषय आहेत.”

 

 

 

Exit mobile version