HW News Marathi
राजकारण

संघाकडून शिकण्यासारखे असे काहीही नाही !

मुंबई | “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकण्यासारखे, घेण्यासारखे असे काहीही नाही. काॅंग्रेस पक्ष हा नेहमीच संघाशी संघर्ष करत आला आहे. त्यामुळे आम्ही कधीही संघाचे अनुकरण करणार नाही”, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आपल्याला संघाचे विचार पटत नसले तरीही त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात”, असे शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले होते. येत्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारपद्धतीबाबत सांगताना शरद पवार यांनी संघाच्या चिकाटीचे उदाहरण दिले होते. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

“संघाचे स्वयंसेवक सकाळी एखाद्याच्या घरी गेले आणि घर बंद असेल तर पुन्हा संध्याकाळी जातात. तेव्हासुद्धा जर संबंधित व्यक्ती भेटली नाही तर ते दुसऱ्या दिवशी जातात. पण संबंधित व्यक्तीला भेटतातच. आपल्याला जरी त्यांचे विचार पटत नसतील तरी त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास काही हरकत नाही. त्या आत्मसात करायलाच हव्यात”, असे शरद पवार यांनी म्हटले होते. ते पुण्यातील भोसरी येथे आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.

लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमध्ये फरक असू शकतो !

अशोक चव्हाण यांनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. “लोकसभा निवडणुकीत यश मिळाले म्हणून भाजपने हुरळून जाऊ नये. या सरकारवर लोक नाराज आहेत आणि ही वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्यावे”, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे, येत्या विधानसभेचाही निकाल भाजपच्याच बाजूने लागेल असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. येत्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लोकसभेपेक्षा वेगळे असू शकतात. तसा विश्वास काँग्रेसला आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna

राफेलबाबत संरक्षणमंत्री एका पाठोपाठ एक खोटे बोलत आहेत !

News Desk

काँग्रेसच्या महासिचवांच्या बैठकीत प्रियांका गांधींची उपस्थिती

News Desk