HW News Marathi
राजकारण

आता मराठा क्रांती मोर्चा देखील निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असताना आता ‘मराठा क्रांती मोर्चा’नेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला मतदान न करणे हीच आमची भूमिका असल्याचे सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (२३ फेब्रुवारी) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. भाजपच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा समाजावर अन्यायच केला, असे क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीत भाजपवर बहिष्कार टाकू, असा स्पष्ट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. “नुसते मोर्चे काढून काहीही साध्य होणार नाही, दबाव आणणेच योग्य आहे. प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली. कमळाने फसवले, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे राज्यभरात वाटप केले जाईल”, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील भाजपच्या गोटात ?

News Desk

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियासह जीएसएसटींचे काय झाले याबद्दल मोदी बोलण्यास तयार नाही !

News Desk

आचरेकरांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार का केले नाहीत !

News Desk