Site icon HW News Marathi

महिला दिना निमित्ताने विधानसभेत महिला सदस्य मांडणार लक्षवेधी

मुंबई | राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा दुसरा आठवडा आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने (International Women’s Day) राज्याच्या विधीमंडळातील दोन्ही सभागृहात आज प्रस्तावित महिला धोरणावर आज चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडणार आहे. तसेच विधानसभेतील कामकाजात आज (8 मार्च) आठ लक्षवेधी सूचना मांडणार आहेत. यात भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, शोमती ठाकूर, श्वेता महाले, यामिनी जाधव, जयश्री जाधव आणि सरोज अहिरे यांचा समावेश आहे.

या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. परंतु, महिला धोरण मंजूर करण्याआधीच महाविकास आघाडी सरकार कोसळले. या महिला धोरण महिला दिनी मंजूर मिळावी, असा प्रयत्न महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आहे.

विधानसभेत आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊतांना 48 तासांत स्पष्टीकरण मागितले होते. संजय राऊत यांच्यासाठी हक्कभंग समिती ही नव्याने गठीत करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हक्कभंग समितीची आज बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Exit mobile version