HW News Marathi
राजकारण

हौसाबाई आठवले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई आठवले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बांद्रा येथील संविधान निवसस्थानासमोर आयोजित आदरांजली सभेस राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत हौसाआईंना आदरांजली वाहिली. दिवंगत हौसाआईंच्या आठवणीने केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले ; सीमाताई आठवले आणि जित आठवले यांच्यासह राज्यभरातील दलित पँथर पासून चे रिपब्लिकन कार्यकर्ते भावूक झाले होते.

वात्सल्यमूर्ती दिवंगत हौसाआई आठवले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली सभेपुर्वी पूज्य भिक्खू संघातर्फे बौद्ध पूजा पाठ करण्यात आला. यावेळी पूज्य धम्म गुरू डॉ राहुल बोधी महाथेरो यांनी धम्मविधी संचलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी दिवंगत हौसाआई आठवले यांना आदरांजली वाहणाऱ्या जाहीर सभेत अनेक कार्यकर्त्यांची अदारांजलीपर भाषणे झाली. अनेकांनी हौसाआईंच्या ममतापूर्ण स्वभावाच्या आठवणी सांगितल्या. आयुष्यभर प्रामाणिक राहून कष्ट करून हिम्मतीने आणि शिस्तप्रिय स्वभावाच्या हौसाआई सर्व महिला वर्गासाठी संघर्षमाता म्हणून आदर्श ठरल्या आहेत.

दिवंगत हौसाआईंना आदरांजली वाहण्यास महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळा चे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजाभाऊ सरवदे; रिपाइं चे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर;महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम; ज्येष्ठ पँथर नेते उमाकांत रणधीर; कमलेश यादव; गौतम सोनवणे; सुरेश बारशिंग; फारुखभाई दळवी; सिद्राम ओहोळ; भीमराव सवातकर;हेमंत रणपिसे; सुमीत वजाळे; रतन अस्वारे ; तानाजी कांबळे; रमेश गायकवाड; सचिनभाई मोहिते; चंद्रकांता सोनकांबळे; गीता कपूर; एड.नैनाताई खराटे; एड. अभयाताई सोनवणे; संगीता अठवले; उषाताई रामळू; दयाळ बहादूरे; राम तायडे; भास्कर वाघमारे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर जारी

Seema Adhe

मुरली मनोहर जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास भाजपचा नकार

News Desk