HW News Marathi
राजकारण

…तर तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही !

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आजपासून सुरू झाली आहे. आज (१ ऑगस्ट) दुपारी २ वाजता मोझरी येथून या यात्रेला प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. मुंडे यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री महोदय, तुमच्या यात्रेला शुभेच्छा, मात्र वेळ मिळाल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची सुद्धा भेट घ्या, असा टोला देखील मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.”

“मुख्यमंत्री महोदय तुमच्या यात्रेला शुभेच्छा! जमल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, कर्जमाफीच्या नावावर फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना, उद्ध्वस्त झालेला कष्टकऱ्यांना, बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!,” असे म्हणत निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रा आजपासून सुरू झाली असून या यात्रेत मुख्यमंत्री ४ हजारहून अधिक किलोमीटर प्रवास करणार आहेत. या यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा प्रवास करणार आहे. या यात्रेतील दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. मात्र, मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेला धनंजय मुंडेनी यांनी शुभेच्छा देत टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांचे आंदोलन राजकीय आंदोलन नाही | शरद पवार

News Desk

नवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा !

News Desk

वॅक्स म्युझियममध्ये आता आठवलेंचा पुतळा  

News Desk