Site icon HW News Marathi

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – एकनाथ शिंदे

बीड  |आमचे सरकार मराठा समाजाला नक्की न्याय देईल,” असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अंत्यदर्शना वेळी म्हणाले. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज (15 ऑगस्ट) बीड येथील राजेगाव या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. 

मुख्यमंत्री म्हणाले, “काही माणसं कुटुंबाप्रति मर्यादित नसतात, त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असते. स्व. विनायक मेटे  हे अशांपैकीच एक नेते होते. मराठा समाजाला आरक्षण व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा त्यांचा एकच ध्यास होता. आमचे सरकार या समाजाला नक्की न्याय देईल.” मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व. मेटे यांनी सतत प्रयत्न केले. मराठा समाजासाठी स्व. मेटे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यासाठी जे जे करावे लागेल, ते सरकार करेल, असे त्यांनी श्रद्धांजली सभेत म्हटले. 

संबंधित बातम्या

विनायक मेटे अनंतात विलीन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

 

Exit mobile version