Site icon HW News Marathi

आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहिलेला नाही! – राज ठाकरे

मुंबई | “आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहिलेला नाही”, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. सध्या राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षाला बळकटी आणण्यासाठी ते कोकण दौऱ्यावर आले असून या दौऱ्याची सुरुवात ही राज ठाकरेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून केली आहे. तसेच राज ठाकरेंनी आज (1 डिसेंबर) सिंधुदुर्ग परिषदेतून त्यांनी काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावर ते सविस्तरपणे त्यांची आणि इतिकास सांगतिला.

इतिहासातील प्रत्येक गोष्टींचे संदर्भ आणि दाखले कुठे सापडत नसतात. इतिहासकारांकडेही नसतात. ते त्यांचे तर्क मांडतात. आणि तर्काच्या आधारावरती गोष्टी इतिहासाला धक्का न लावता. त्यातून काही चुकीचे अर्थ न जाता हा इतिहास काही जण उभा करत असतात. आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहिलेला इतिहास नाही, मुळ दाखले हा आहेत.  त्यामुळे हे पोतुर्गीज, मोगल आणि ब्रिटिशांकडून आलेले काही अनेक गोष्टी, त्यावेळेसचा महाराजांच्या काळातील ग्रंथ म्हणजे शिवभारत त्या काही गोष्टी सापडतात ते. या व्यतिरिक्त असे काही दाखलेच नाहीत. पत्रच नाही येत, त्यामुळे यातून काही शोधून आपल लोकांपर्यंत इतिहास पोहोचवावा लागतो. त्यामुळे ही नावे होती की ही नावे होती. याला काही अर्थच नाही उरला, या गोष्टी मी त्यांच्या बोलत होतो. तेव्हा ते मला म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवू शकत नाही. फक्त त्याला कुठे धक्का लागणार नाही. ते बघणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पुत जन्माला येईचा आहे.

‘वेडात वीर दौडले सात’ सहा नावांचा कुठेही पुरावे नाही

‘वेडात वीर दौडले सात’ चित्रपटावरून सुरु असलेल्या वादासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, ” ‘वेडात वीर दौडले सात’ मग त्या दिग्दर्शकाने सहा लोकांची नावे टाकली. अजून काही लोक म्हणाली की, ही सहा नावे नाही तर ही नावे आहेत. असे जेव्हा काही होते, तेव्हा मला इतिहासाबद्दल नेहमीच कुतुहल वाटते. ही जी तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांच्याशी आपण बोलले पाहिजे. समजून घेतले पाहिजे.  मध्यंतरी मी गजानन मेंहदळेंना भेटलो. मी त्यांना विचारले ‘वेडात वीर दौडले सात’ काही जण ही नावे सांगत आहेत. तर काही ही नावे सांगत आहेत. याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे. मी काल पवारसाहेबांशी पण बोललो, ते मला म्हणाले गजानन राव बरोबर बोलत आहेत. कारण गजानन राव हे इतिहासासंदर्भात जेकाही दाखले त्यांचे ते अभ्यासक आहेत. मी मेंहदळेंना विचारले हे काय आहे. ते शांत बसले, मला म्हणाले, जगातील कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात होते, का आठ होते, का दहा होते, असे कुठेही लिहिलेले नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजरांबरोबर कोणत्या नावाची कोणकोण होते. याचा काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावे ऐकली. ती सगळी काल्पनीक नावे आहेत. छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजरांना पत्र पाठविले, असे कुठलेही पत्र आजपर्यंत सापडलेले नाही. ते पत्र पाठविले, अशा प्रकारचा दाखला कुठे तरी एका ठिकाणी  फक्त आहे. त्या पलिकडे कुठलाही पुरावा नाही, प्रतापराव गुजर ‘प्रतापराव गुजर मारलिया’ आणि ‘प्रतापराव गुजर पडला’ ऐवढ्या दोन ओळी कुठल्यातरी पत्रात आहेत. या व्यतिरिक्त त्या संपूर्ण लढाईचा कुठेही इतिहासाच्या पानातसंदर्भ नाही”, असे त्यांनी इतिहासकारांसोबत झालेल्या चर्चेनंतर म्हणाले.

जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहाणे गरजेचे

राज ठाकरेंनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांची भेट घेतली, यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे, असे पत्रकारांनी सांगितल्यावर राज ठाकरे म्हणाले, “जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहाणे गरजेचे आहे. सध्या इतिहासाकडे जातीतून बाहण्याचे पेऊ फुटलेले आहे. ते काही ठरावीक लोकांचे आहे. अगदीच मुठभर लोकांचे आहे. आणि तो ही त्यांचा राजकीय स्वार्थ, त्यातूनही थोडीशी या लोकांनी बोलणे आवश्यक आहे.”

 

 

 

 

Exit mobile version