HW Marathi
देश / विदेश राजकारण

पाकिस्तानकडून दिल्ली ते लाहोर बससेवा देखील स्थगित

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर नाराज पाकिस्तानने भारताविरुद्ध कुरघोड्या सुरु केल्या आहेत. भारत-पाकिस्तानच्या नागरिकांना जोडणारी समझौता एक्स्प्रेस बंद केल्यानंतर आता पाकिस्तानने दिल्ली ते लाहोर बससेवा देखील स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर दिल्ली वाहतूक महामंडळाने देखील ही बस रद्द केली. त्यामुळे दिल्लीहून लाहोरला जाणारी बस देखील रवाना झालेली नाही.

“आपण युद्धाला तयार आहोत”, असे म्हणत यापूर्वी पाकिस्तानकडून सीमारेषेवर सैन्यही वाढविण्यात आले आहे. पाकिस्तानकडून पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एकीकडे बुधवारी (७ ऑगस्ट) पाकिस्तानकडून भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्यात आले. तसेच, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतासाठी ६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर इतक्या काळासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर समझौता एक्स्प्रेस बंद करण्यात आली.

Related posts

काँग्रेसच लढविणार पुणे मतदार संघ

News Desk

वनविभागाच्या पथकाला दिसले अवनी वाघिणीचे बछडे ?

News Desk

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक