HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश | पांडुरंग बरोरा

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी आज (१० जुलै) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांच्या समवेत शहापूरमधील त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. “सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचे पांडुरंग यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले.”

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे  बरोरा यांनी काल (९ जुलै) त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. १९८० पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने अखेर पक्षासोबत फारकत घेतली. बरोरा आज शिवसेनेचे शिवबंध हाती बांधले आहे.  ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी नेते म्हणून पाहिले जात होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादची होत असलेली पिछेहट आणि भाजप नेत्यांचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊनच बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधणार आहे. आगामी ३ ते ४ महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत.

Related posts

जलयुक्त शिवार अभियान, पाणी टंचाईवर कायमची मात

News Desk

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत ?

News Desk

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार | उद्धव ठाकरे

News Desk