HW News Marathi
राजकारण

तुम्हाला जनतेने राज्य दिले, आता मंत्रिमंडळ विस्तार तरी करा !

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास महिना पूर्ण होत आला असला तरीही अद्याप राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राजच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या सरकारने केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे खातेवाटप केले होते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारला वेळोवेळी धारेवर धरण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर आता राज्यातील ‘ठाकरे’ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “तुम्हाला जनतेने राज्य दिलंय, आता किमान मंत्रिमंडळ विस्तार तरी करा”, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. बदलापूर येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

“राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता विरोधाभासाने राज्यात स्थापन झालेले हे सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असेल कि इतके दिवस राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यातील जनतेने जर तुम्हाला राज्यात सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे तर मग तुम्ही किमान मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्य तरी नीट चालवा”, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील महाविकासाआघाडी सरकारवर घेतली आहे.

२८ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी २-२ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या नेत्यांची खाती यावेळी स्पष्ट करण्यात आली नाहीत. त्यानंतर, महाविकासआघाडीच्या सरकारकडून राज्याच्या मंत्रिमंडळाचे तात्पुरत्या स्वरूपाचे खातेवाटप करण्यात आले. त्यामुळे, अनेक दिवस रखडलेला आणि आता ३० डिसेंबर रोजी होऊ घातलेला राज्याच्या या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध

News Desk

भाजपचे नाराज खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk