HW News Marathi
राजकारण

यंदा काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (६ मे) रोज तोफा थंडावणार आहे. यापूर्वी सर्वजण उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला आहे. यात आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातील आपचे उमेवार दिलीप पांडे यांच्या प्रचारासाठी रोड शो ३ मो रोजी आयोजित केले होते. यावेळी केजरीवाल यांनी रोड शोदरम्यान भाजपचे उमेदवार मनोज तिवारी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

केजरीवाल यांनी रोड शोमधील जनतेला संबोधित करताना म्हणाले की, भाजपचे उत्तर-पूर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार मनोज तिवारी हे नाचताना चांगले दिसतात. आपचे यामतदार संघातील उमेदवार दिलीप पांडे यांना नाचता येत नाही. मात्र काम करता येते. त्यामुळे तुम्ही यंदा काम करणाऱ्याला मत द्या नाचणाऱ्याल देऊ नका, अशा शब्दात केजरीवाल यांनी मनोज तिवारींवर हल्लाबोल केला आहे.

तसेच उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.केजरीवाल यांच्या टीकेला मनोज तिवारी यांनी उत्तर देत म्हणाले की, केजरीवाल यांनी केलेले विधान हे ‘पूर्वांचल’च्या लोकांचा अपमान केला आहे. आता निवडणुकीत हेच लोक केजरीवाल यांना चोख उत्तर देतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर…सरकार दिशाभूल करतेय !

News Desk

मला यात काहीही चुकीचे वाटत नाही !

News Desk

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार

Aprna