HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौ-यावर

नवी दिल्ली | आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे दौरा आहे. दरम्यान ते गाझीपूरमधील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दौ-या दरम्यान पंतप्रधान मोदी गाझीपूरमधील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे. परंतु राजकीय विश्लेषक त्यांच्या या वारणसी दौ-याचे राजकीय दृष्ट्या वेगवेगळे अर्थ काढत आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्वांचलमध्ये सत्ता स्थापन करत विजयाची पताका फडकवीली होती. म्हणून पुन्हा एकदा वाराणसी आणि गझीपूरमध्ये हा विजय टिकवून ठेवण्याचा मोदी सरकारचा हेतू आहे. बनारस आणि गझीपूरच्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे सदर ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तगडी करण्यात आली आहे. 6 हजार हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान मोदींची मतदारसंघातली ही दुसरी भेट आहे. आपल्या संपूर्ण कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांनी १६ वेळा वाराणसीला भेट दिली आहे.

गाझीपूर जिल्ह्यात पंतप्रधानांचे हेलीकॉप्टर १२.२० वाजता आरटीआय क्षेत्रात उतरेल. ते गाझीपूरमध्ये सुमारे तीन तास असणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर गझीपूरमध्ये त्यांचा हा दुसरा दौरा आहे. आधी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी ते या ठिकाणी आले होते. गझीपूरमध्ये पंतप्रधान महाराज सोहेलदेव यांच्या नावाने एक पोस्ट टिकीट जारी करणार आहेत त्यानंतर सभा घेऊन ते जनतेला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ सरकारचे वरिष्ठ मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी आधीच जाहीर केले आहे की पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार नाहीत. डाक तिकिटांवर महाराज सुहेलदेव राजभर यांचे संपूर्ण नाव नमूद न केल्यामुळे राजभर प्रचंड नाराज आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा तर भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

News Desk

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर उपनेते पदी नियुक्ती

Aprna

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

swarit