HW Marathi
देश / विदेश राजकारण

पंतप्रधान मोदी जेव्हा समुद्र किनारा साफ करतात तेव्हा…

चेन्नई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे काल (११ ऑक्टोबर) महाबलीपूरममध्ये स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी आज (१२ ऑक्टोबर) महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. जवळपास अर्धा तास मोदी यांनी समुद्र किनाऱ्यावर कचरा गोळा केला. प्लास्टिकची पाकिटे, बाटल्या आणि इतर कचरा मोदींनी गोळा करून साफसफाई केली आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असे म्हटले आहे.

‘आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केली पाहिजे. असे आवाहन नागरिकांना मोदींनी केले आहे. साफसफाई करतनांचा तीन मिनिटांचा व्हिडिओ मोदींनी त्यांच्या ट्विटवर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा हा ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या हॉटेलचा कर्मचाऱ्याकडे दिला. तसेच पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दोन दिवसांची शिखर परिषद होणार असून या परिषदेमध्ये अनौपचारिक स्वरुपाची चर्चा होणार आहे.

 

Related posts

शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदींनी महात्मा गांधी, वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

News Desk

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाला सुप्रिया सुळेंचा विरोध

News Desk

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक 6 डिसेंबर 2020 पर्यंत उभारले जाणार !

News Desk