May 24, 2019
HW Marathi
मनोरंजन राजकारण लोकसभा निवडणुक 2019

लोकसभेच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित होणार ‘पीएम नरेंद्र मोदी’

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकत होते. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली होती. दरम्यान, अखेर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या २४ मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त वाळू शिल्पातून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित

News Desk

सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर

News Desk