HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं ऐकणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की राज ठाकरे स्वतः पंतप्रधान मोदींची भाषणं ऐकायला उपस्थित राहणार का? तर याचं उत्तर आहे नाही. पण राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या बंगल्यावरच आता पंतप्रधान मोदींचा आवाज घुमणार आहे.

आता तुम्हाला असं वाटेल की गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढत आहेत. त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच आता स्वतः नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंना भेटायला येणार आहेत की काय? पण तसं सुद्धा नाहीये… पण पंतप्रधान मोदींचा आवाज शिवतीर्थवर घुमणार हे मात्र नक्की आहे.

आपल्याला माहितच आहे की राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. इतकंच काय तर भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी, तसंच समर्थकांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद या सगळ्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेत आहे. अशातच आता राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्यात आले असता यावेळी त्यांना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पेशल गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकू येणारी खास भेटवस्तू सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंना भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच ‘शिवतीर्थ’वर आता मोदींचा आवाज घुमणार असल्याचं बोललं जातंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी! हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त

News Desk

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं आणि फडणवीसांचं राज्य आलं”

News Desk

हेगडेंनी केलेल्या या आरोपाचे फडणवीसांनी केले खंडण

News Desk