HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl case)  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए न्यायालयाने तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने 16 तासांच्या चौकशीनंतर काल (31 जुलै) रात्री उशिरा राऊतांना अटक करण्यात आली होती. यानंतर राऊतांना आज (1 ऑगस्ट)  जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीएमएलए न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने राऊतांना ईडी कोठडीदरम्यान सकाळी 8.30 ते 9.30 वाजेपर्यंत वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे.  संजय राऊत हे हर्ट पेशंट असल्यामुळे त्यांना घरचे जेवण आणि औषधांची मुभा दिली आहे. रात्री 10.30 वाजल्यानंतर राऊतांची कोणतीही चौकशी करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

या प्रकरणात न्यायालयाने विशेष सरकारी वकिल हितेन यांनी राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला 1 कोटीसह लाखांचा फायदा झाल्याचे म्हटले होते. राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हात असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळवला असल्याचा आरोपही ईडीने केला होता. या प्रकरणात राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. राऊतांना सोडले तर पुन्हा असे कृत्य होऊ शकते. यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्याची मागणी, ईडीने करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून माझी बहिण मला तुरुंगात पाठविण्याच्या प्रयत्नात !

News Desk

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – एकनाथ शिंदे

Aprna

चले जाओ मोदी

News Desk