HW News Marathi
राजकारण

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

जळगाव | राज्यात आज सांगली -मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान शांततेत सुरु आहे.हे मतदान सायंकाळी ५.३० वाजेपर्यत सुरु रहाणार आहे. मात्र जनतेने कौल नेमका कोणाच्या बाजुने दिला? हे पहाण्यासाठी सर्वांनाच ३ ऑगस्टची वाट पहावी लागणार आहे.

जळगाव महानगरपालिकेमधून निवडणुकीसाठी एकुण ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून यात ९ पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र खरी लढत हि भारतीय जनता पक्ष व शिवसेने मध्ये आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून महानगरपालिका सुरेशदादा जैन यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आगामी काळात कोण सत्तेत येणार याकडे जळगाव कराचे विषेश लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय असेल भाजपची स्थिती ?

News Desk

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit