HW News Marathi
राजकारण

महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन, पवार ‘शकुनीमामा’ तर राहुल रा’फूल’ !

मुंबई | मुंबईतील भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना चक्क रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली आहे. विरोधकांची महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन असल्याचे देखील पूनम महाजन यांनी यावेळी म्हटले आहे. विरोधकांचा मोदींच्या विकासाला अडविण्याचा प्रयत्न साध्य होणार नाही. महाआघाडीच्या दलदलीत भाजपचे कमळच उमलेल, असा विश्वास पूनम महाजन यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पूनम महाजन यांनी राहुल गांधींसह प्रियांका गांधींवर देखील निशाणा साधला आहे.

केवळ आपल्या आईचेच ऐकणारे, सारखे राफेल-राफेल करणारे राहुल गांधी हे ‘राफूल’ तर प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी करण्यात आलेली नियुक्ती म्हणजे ‘बेटी लाओ और बेटा बचाओ’ कार्यक्रम, असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली आहे. पूनम महाजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. ममता बनर्जी या ‘टेरर मेकिंग दादा’ आहेत. त्यांचे काम अमानुष आहे. रोज एकमेकांशी कुत्र्यामांजरांसारखे भांडणारे अखिलेश यादव- मायावती मोदी नावाच्या सूर्याला रोखण्यासाठी महाआघाडी करत आहेत.

काँग्रेसने प्रियांका गांधींचे इतके फोटो व्हायरल केले आहेत की त्यांना तैमूर अली खान असल्यासारखेच वाटत होते, अशीही टीका पूनम महाजन यांनी यावेळी केली. आपण सगळ्यांचे ऐकले असे दाखवून शरद पवार शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करतात. स्वत:ला मिळाले नाही, की इकडचे तिकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची स्थिती झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींवरील जीवनपट म्हणजे निवडणुकांमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न !

News Desk

‘क्रांती गाथा‘ हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल! – मुख्यमंत्री

News Desk

भाजप नाही, काँग्रेसच दलितविरोधी पक्ष !

News Desk